fbpx

हे सरकार फक्त शिवाजी महाराज यांचं नाव वापरतं

कन्नड – संपूर्ण महाराष्ट्रात आज भीषण दुष्काळ आहे. दीड महिन्यांपूर्वी दुष्काळाबाबतीत घेतलेल्या बैठकांचा फलित काय? असा प्रश्न उपस्थित करत विधानपरिषदचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुडे यांनी सरकारवर कडाडून टीका केली. ते कन्नड येथे राष्ट्रवादीच्या निर्धार परिवर्तन यात्रेत बोलत होते.

यावेळी धनंजय मुंडे म्हणले की, शेतकऱ्यांसाठी आपल्या राज्याची तिजोरी रिकामी करण्याचा आदर्श छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्यासमोर ठेवला आहे. हे कृतीशुन्य सरकार फक्त शिवाजी महाराज यांचं नाव वापरतं. त्याच्या पलीकडे छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श मात्र घेताना दिसत नाही.

चंद्रकांत खैरे साहेब, औरंगाबाद लोकसभा मतदार संघाच्या सातबाऱ्यावर तुमचे नाव कायम कोरले आहे असे समजू नका. येणाऱ्या लोकसभा निवडणुकांमध्ये या मतदारसंघात परिवर्तन होणारच हा माझा विश्वास आहे, असेही यावेळी मुंडे म्हणले.