सरकारने निर्यातबंदी मागे घ्यावी अन्यथा रस्त्यावर उतरु- युक्रांद

yukrand

अहमदनगर : कोणतीही पूर्व सूचना न देता केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने कांदा निर्यात बंदीचे पत्रक काढले आहे. हा शेतकरी विरोधी निर्णय आहे. तो तातडीने रद्द करावा अशी मागणी युक्रांदने प्रांताधिकारी यांना निवेदन देऊन केली आहे.गेल्या काही महिन्यांपासून कोरोना या रोगामुळे उत्पादित शेतीमालाचे भाव मोठ्या प्रमाणावर पडले आहेत. याचा मोठा तोटा शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. यावर्षी तर कांदा उत्पादन खर्चा पेक्षा कमी किंमतीला विकावा लागला आहे. काल परवा थोड्या किंमती वाढायला सुरुवात झाली होती, की लगेच केंद्र सरकारने कांद्याची निर्यात बंद केला.

हा शेतकऱ्यांना मातीत घालणारा निर्णय आहे.

गेल्या जून महिन्यात मोठ्या तुताऱ्या वाजवत केंद्र सरकारने कांदे, बटाटे यासह पाच प्रकारचे शेतमाल आवश्यक वस्तू कायद्यातून वगळले असल्याची घोषणा केली होती. त्यासाठी कारण दिले होते की, शेतकऱ्यांना चार पैसे मिळायला लागले की हा कायदा आडवा येतो त्यामुळे हा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. आवश्यक वस्तू कायद्यात बदल केला आहे. हा क्रांतिकारी निर्णय आहे हे स्वतःच केंद्र सरकारने तीन महिन्यांपूर्वी जाहिर केले होते.

हा कांदा निर्यात बंदीचा निर्णय केंद्र सरकारने तत्काळ मागे घ्यावा. अन्यथा शेतकरी रस्त्यावर उतरून सरकारला जाब विचारल्याशीवाय राहणार नाहीत.यावेळी युक्रांदचे राज्य सहकार्यवाह अप्पा अनारसे, पुणे शहराध्यक्ष कमलाकर शेटे, राशीन शहराध्यक्ष विनोद सोनवणे, सागर जाधव, रवळगाव युक्रांदचे रवी गोरे , ऋषिकेश आडागळे ,योगेश लोंढे ,सलीम आतार उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या :