सरकारने अहमदनगर जिल्यात ओला दुष्काळ जाहीर करावा- शिवाजी कर्डिले

shivaji kardile

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- परतीच्या पावसाने अहमदनगरला झोडून काढल्यामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक भागांतील वस्त्यांमध्ये पाणी शिरले असून त्यामुळे साठवलेले अन्नधान्य भिजले आहे. तसेच शेतकऱ्यांच्या पिकाचेही मोठे नुकसान झाले.

भाजप सरकारच्या काळामध्ये शेतकर्‍यांवर जेव्हा जेव्हा संकट आले तेव्हा तेव्हा भाजप सरकारने शेतकर्‍यांना विविध योजनेमार्फत मदत केली होती. केंद्र व राज्य सरकारने मिळून मोठी कर्जमाफी केली. यावर्षी मोठ्या प्रमाणात झालेल्या सततच्या पावसामुळे शेतकर्‍यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

तरी या तीन पक्षाच्या सरकारने लवकरात लवकर पिकांचे पंचनामे करुन शेतकर्‍यांना आर्थिक मदत जाहीर करावी. या अतिवृष्टीमुळे नगर जिल्ह्याला ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी केली आहे.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेच्यावतीने अकोळनेर, नारायण डोह, चास, भोयरे पठार व उक्कडगाव येथील शेतकर्‍यांना खेळते भांडवलचा चेक वाटप करताना माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले बोलत होते. यावेळी कर्डिले म्हणाले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना संकटाच्या काळामध्ये विविध योजनेमार्फत शेतकर्‍यांच्या थेट खात्यामध्ये आर्थिक मदतीचा लाभ दिला आहे.

आता नगर जिल्ह्यालासह महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेली पिके नष्ट झाली आहेत. अनेक ठिकाणी गंजीच्या गंजी वाहून गेल्या आहेत. ही सर्व पिके बाजारात नेता येतील, अशा अवस्थेत होती. या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अशा कठीण परिस्थितीत सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याची गरज आहे, असे कर्डीले म्हणाले.

यावेळी बाजार समिती सभापती अभिलाष घिगे, उपसभापती संतोष म्हस्के, विजय जाधव, खरेदी विक्री संघाचे चेअरमन सुरेशराव सुंबे, दिलीप भालसिंग, रेवणनाथ चोभे, शिवाजी कार्ले, संतोष कुलट, बाळासाहेब निसे, बाबासाहेब जाधव, अशोक झरेकर, नंदा शेंडगे, सविता मेहत्रे, शितल जाधव, संजय गारूडकर, राजेंद्र शेळके, रावसाहेब साठे, साहेबराव कोळगे, सुभाष गवळी, राधाकृष्ण वांळुज, राजेंद्र गावखरे, रावसाहेब कार्ले, पांडुरंग देवकर, रामदास सोनवणे, अशोक साठे, छत्रपती बोरुडे, बाळासाहेब मेटे, मच्छिंद्र साठे, बाळासाहेब म्हस्के, किशोर गायकवाड यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.