fbpx

निवडणूक होताच शेतकऱ्यांच्या खात्यातून २ हजार रुपये घेतले परत ?

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणूक आता पार पडली आहे.फक्त शेवटच्या टप्यातील मतदान आणि निवडणुकीचा निकाल जाहीर होणे शिल्लक आहे. असे असतानाच उत्तरप्रदेश मधून धक्कादायक वृत्त बाहेर येत आहे. भाजप सरकारकडून पंतप्रधान शेतकरी सन्मान योजने अंतर्गत शेतकऱ्यांना देण्यात आलेले अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यातून काढून घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. ही अफवा असल्याच वाटत असल तरी उत्तरप्रदेश मधील वृत्तपत्रांमध्ये याबाबत वृत्त छापून आल आहे.

निवडणूक पूर्वीच्या भाजप सरकारच्या अंतरिम अर्थ संकल्पामध्ये अल्पभूधारी शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार देणारी पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना लागू करण्यात आली. या योजनेनुसार अल्पभूधारी शेतकऱ्याला वर्षाला सहा हजार हे तीन टप्यात देण्यात येणार आहेत असे जाहीर करण्यात आले. आणि त्यानुसार पहिला हप्ता म्हणजे २ हजार रुपये शेतकऱ्याच्या खात्यात जमा देखील झाले. परंतु हे भाजप सरकारकडून देण्यात आलेले अनुदान केवळ मतासाठीचं दिल्याच समोर आल आहे. कारण राज्यातील काही शेतकऱ्यांनी आपल्या खात्यावरून २ हजार रुपये परत घेण्यात आल्याच्या तक्रारी केल्या आहेत. मुजफ्फरपूरमधील जनपद भागातून अशा तक्रारी आल्या आहेत.

बँकेत पैसे काढण्यास गेल्यानंतर खात्यावर पैसेच नसल्याचे समोर आले आहे. त्यानंतर शेतकऱ्यांना पंतप्रधान शेतकरी अनुदान योजनेचे पैसे परत घेण्यात आल्याचे समजले. या संदर्भात बँकेच्या कर्मचाऱ्यांना विचारल्यानंतर त्यांनी सांगितले की, शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम नसून त्यांच्या खात्यातील रक्कम कट करण्यात आली आहे. किसान एकता संघटनेने बँकांच्या कृतीचा विरोध केला असून सरकारने शेतकऱ्यांना धोका दिल्याचे म्हटले आहे.

दीड महिन्यापूर्वी खात्यावर २ हजार रुपये जमा झाल्याचा संदेश आला होता. मात्र आता बँकेत पैसे काढण्यासाठी गेलो तर कळलं की, खात्यात रक्कम नाही, असं फिरोजाबाद येथील शेतकरी निरोत्तम सिंह यांनी सांगितले.