#नाणार : अन्यायाविरोधातील मोर्चाला सरकारने परवानगी का नाकारली ? – सुनिल तटकरे

नागपूर  – नाणार प्रकल्पाबाबत आमदार सुनिल तटकरे यांनी आज विधानपरिषदेमध्ये स्थगन प्रस्ताव मांडला. यावेळी शासनाला रुल्स ऑफ बिझनेस स्पष्ट करा अशी मागणी करत नाणारवासियांवर होत असलेल्या अन्यायाविरोधातील मोर्चाला सरकारने परवानगी का नाकारली याबाबत सरकारला जाब विचारत सरकारने मोर्चाला सामोरे जावे असे आव्हानही आमदार सुनिल तटकरे यांनी केले.

नाणार प्रकल्पाबाबत मुख्यमंत्र्यांकडून योग्य तो खुलासा होत नसल्याने नाणारप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार सभागृहात आक्रमक झाले. आमदार सुनिल तटकरे यांनी नाणारप्रकरणी स्थगन प्रस्ताव मांडतानाच रुल्स ऑफ बिझनेस याचं स्पष्टीकरण मागितलं मात्र रुल्स ऑफच्या नावाखाली सरकार जनतेची फसवणूक करत असल्याचा आरोपही सुनिल तटकरे यांनी केला. सरकारच्या या धोरणाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाच्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी करत सभागृह दणाणून सोडले.

Rohan Deshmukh

फसव्या सरकारला ओहोटी लागली; सुनील तटकरे

Latur Advt
You might also like
Comments
Loading...