स्वच्छता मंत्र्यांच्या गावातच शासकीय कार्यालयात स्वच्छतेचे ‘तीन तेरा’

परतूर: परतूर शहरातील महावितरण कार्यालयात ग्राहकांची नेहमीच जास्तीची वर्दळ असते. या कार्यालयात तालुक्यातील खेडेपाड्यातील नागरीक पण बिल भरण्यासाठी मोठ्या प्रमाणात येत असतात. त्या नागरीकांना बसण्याची सोय तर नाहीच शिवाय बील भरण्यासाठी वीज ग्राहक ज्या ठिकाणी उभे राहतात त्या ठिकाणी गूटका खाऊन थुंकणारांनी भिंती रंगवून टाकल्या आहेत आपले पंतप्रधान देशाला स्वच्छ करण्यासाठी अहोरात्र कष्ट करत आहेत आणि एकिकडे शासकीय कार्यालयच स्वच्छ नसल्याने परतूर शहराच्या स्वच्छतेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे

महावितरण च्या कार्यालयात आम्ही बिल भरायला गेल्यानंतर लांबच लांब रांगा असतात परंतु या ठिकाणी नागरीकांना बसण्याची व्यवस्था तर नाहीच नाही शिवाय कार्यालय अस्वच्छ असल्याने दुर्गंधीमुळे इथे थांबायला सुद्धा नको होते किमान बिल भरण्यासाठी आलेल्या नागरीकांना या ठिकाणी उभा तरी राहू वाटले पाहीजे.     प्रदीप वाघमारे वीज ग्राहक

महावितरणच्या कार्यालयांच्या स्वच्छतेसाठी कुठलाही निधी येत नाही आणि कर्मचारी ही ते स्वच्छ करू शकत नाही विशेष म्हणजे ती घाण ग्राहकांनी केलेली असल्याने त्याची जिम्मेदारी कर्मचाऱ्यांची नाही
श्री देवकर कार्यकारी अभियंता महावितरण परतूर