शनी शिंगणापुर देवस्थान कमिटीचे शासनाने भुमाता ब्रिगेडच्या रणरागिणीला अध्यक्षपद द्यावे.

टीम महाराष्ट्र देशा: मंगळवारी भुमाता ब्रिगेडच्या रणरागिणी तृप्ती देसाई यांनी शनी शिंगणापुर देवस्थानला आपल्या कार्यकर्त्यांसह येऊन भेट दिली.देसाई यांनी चौथऱ्यावर जाऊन शनिदेवाला पुष्पहार अर्पण करुन स्पर्श दर्शन घेतले.देवस्थानमधील भ्रष्ट कारभार उघड करुन कमिटी बरखास्त करणे व महीलांना चौथऱ्यावरुन दर्शन घेण्याबाबत अनेक अंदोलने केली त्यामुळे महीलांना आता चौथऱ्यावरुन दर्शन घेता येते.

शासनाने भ्रष्ट कमिटी बरखास्त केली परंतु अद्याप नविन कमिटी स्थापण केली नसल्याने शासनाकडे लवकरात लवकर नुतन कमिटी स्थापन करावी तसेच ५० टक्के महीलांचा कमिटीमधे समावेश कराण्यात यावा याप्रकारची मागणी शासनाकडे करणार असल्याची माहीती प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.भुमाता ब्रिगेडने वेळोवेळी अंदोलन केले त्यामुळे शासनाने भुमाता ब्रिगेडच्या रणरागिणीला अध्यक्षपद द्यावे.अशी इच्छा व्यक्त केली.