सावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण 

टीम महाराष्ट्र देशा- शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्याला अवैध सावकारांनी विळखा घातला असुन एकी कडे सावकारांच्या जाचाने त्रस्त असलेले शेतकरी सरकारी अधिकाऱ्यांच्या लाचखोर प्रवृत्ती मुळे वैफल्यग्रस्त झाले आहेत. इंग्रजाच्या राजवटीपेक्षा सरकारी यंत्रणा अधिक जाचक असुन ही व्यवस्था शेतकऱ्यांच्या मुळावर उठली असल्याची तोफ राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार विद्या चव्हाण यांनी डागली.

महागाव तहसील कार्यालया समोर सावकार ग्रस्त शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने आज धरणे आंदोलन करण्यात आले. त्यावेळी सावकार आणि भ्रस्ट सरकारी यंत्रणे वर विद्याताई चव्हाण तुटून पडल्या. त्या म्हणाल्या की माजी गृहराज्यमंत्री आर आर पाटील यांच्या प्रयत्नाने सावकारी अधिनियम कायदा  २०१४ मध्ये पारित झाला. अवैध सावकारांना ”कोपरा पासून ढोपरा प्रयत” सोलून काढण्याची बांधिलकी आबांनी स्वीकारली होती. परंतु सरकारी यंत्रणेकडून सावकारी आधी नियमाची अंमलबजावणी प्रामाणिक पणे केली जात नसल्यामुळे शेतकऱ्यांना सावकारांच्या तावडीतुन बाहेर काढणे मुश्कील  झाले आहे. सरकारी अधिकाऱ्यांची भूक राक्षसा पेक्षा जास्त असुन गल्लेलठ्ठ पगार असताना सावकारा कडून लाच खातांना त्यांना लाज वाटत नाही असा संताप आमदार विद्याताई चव्हाण यांनी व्यक्त केला.

Loading...

जिल्हा निबंधकांनी शेतकऱ्यांच्या बाजुंनी निकाल दिल्या नंतर अवैध कमाई करणारे सावकार न्यायालयात जात असल्याने गोर-गरिबांना पैश्या अभावी खटले लढणे दुरापास्त झाले असुन त्यांना न्याया पासुन वंचित राहावे लागत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस सर्व सावकार ग्रस्त शेतकऱ्यांच्या बाजूने खंबीर पणे उभी असुन त्यांच्या मालकीची जमीन सावकाराच्या तावडीतून सोडविण्यासाठी आम्ही कृतसंकल्प आहोत असा पुनरुच्चार त्यांनी केला.

सावकार ग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देताना आमदार ख्वाजा बेग म्हणाले की जिल्हा निबंधकांनी निर्णय दिल्या नंतर सावकारांनी उच्च न्यायालयात दाखल केलेली प्रकरणे विशेष कायदा करून शासनाने काढून घ्यावीत. व सावकार ग्रस्त शेतकऱ्यांना शेतीची मालकी पूर्ववत बहाल करावी अशी मागणी त्यांनी केली. यावेळी प्राध्यापक घनश्याम दरणे यांनी अवैध सावकारा कडून होणारी शेतकऱ्यांची पिळवणूक आणि न्याय मिळवण्यात होणार विलंब या विषयी  मार्गदर्शन केले.

ऊस दर आंदोलन म्हणजे केवळ स्टंटबाजी : सदाभाऊ

यावेळी शंतून पाटील, वर्षाताई निकम, मनीषा काटे, डॉ आरतीताई फुफाटे, साहेबराव पाटील यांनी ही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. सावकारग्रस्त शेतकरी लक्ष्मीबाई अडकीने हिवरा, माणिकराव मिलमिले बाभूळगाव, अनिल राठोड इजनी, गयाबाई जाधव इजणी, रेखा चौधरी देवळी, सुनीता नजरधने उमरखेड, शांता बाई राठोड इरथळ, अवधूत वानखेडे मुडाना यांनी डोळ्यात पाणी आणून आपली व्यथा मांडली. धरणे आंदोलनात राजुभय्या जयस्वाल, अनिल नरवाडे, विजय सूर्यवंशी, नाना भवरे, संदीप ठाकरे, वर्षा भवरे, विजय महाजन, डॉ धोंडीराव बोरूळकर, समशेर लाला, स्वप्नील अडकीने, व शेकडो शेतकरी उपस्थित होते.

मोदींचा एखादा दौरा रद्द करुन हवामान विभागाला चांगला सॅटेलाईट घ्या : राजू शेट्टी

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
पंतप्रधान मोदी छत्रपती शिवाजी तर शहा तानाजींच्या रुपात; शिवसेनेच्या ढाण्या वाघाची पहिली प्रतिक्रिया
सुप्रिया सुळे यांनीही पहिला 'तान्हाजी', चित्रपट पाहून म्हणाल्या...
'सत्ता गेली तरी चालेल, पण सावरकरांना भारतरत्न देण्याच्या शिवसेनेच्या मागणीला आमचा विरोध'
थोरात साहेब तुम्हाला घराणेशाहीतले 'युवा आमदार'दिसले पण शेतकऱ्याचं पोरगं देवेंद्र भुयार दिसला नाही का ?
कोणाशीही आणि कशीही युती करेन पण एकदा दिल्लीला जाणारच : महादेव जानकर
इतिहासावरून देवेंद्र फडणवीस-आदित्य ठाकरेंमध्ये जुंपली
यातून शिवसेनेचा खरा चेहरा उघड झाला - देवेंद्र फडणवीस
वंशज असल्याचे पुरावे मागणे चुकीचेचं नाही तर मूर्खपणाचे
रावसाहेब दानवेनंतर शिवसेनेचे गुलाबराव पाटील ही म्हणाले सालेहो!