शिवरायांच्या पुतळ्याची उंची कमी करून सरकारने महाराष्ट्राची मान खाली घातली

भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचे सरकार केवळ पैसे वाचवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अरबी समुद्रातील पुतळ्याची उंची कमी करत असून, या कृत्यामुळे अवघ्या महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेल्याचा घणाघात राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील 121.2 मीटर उंचीच्या अश्वारुढ पुतळ्याला मान्यता मिळाली होती. त्यामध्ये 83.2 मीटर महाराजांच्या पुतळ्याची उंची तर 38 मीटर तलवारीची उंची होती. परंतु, भाजप-शिवसेनेच्या सरकारने केवळ खर्च कमी करण्यासाठी पुतळ्याची एकूण 121.2 मीटर उंची तशीच ठेवली. मात्र छत्रपतींच्या पुतळ्याची उंची 83.2 मीटरवरून 75.7 मीटर इतकी कमी केली तर तलवारीची उंची 38 मीटरवरून 45.5 मीटरपर्यंत वाढविली. तसेच छत्रपतींच्या पुतळ्याचा चौथरा 96.2 मीटरवरून 87.4 मीटरपर्यंत कमी करण्यात आला आहे.

You might also like
Comments
Loading...