मराठा मोर्च्याच्या आंदोकालकांशी सरकार चर्चेच्या प्रयत्नात ; आंदोलकांकडून मात्र प्रतिसाद नाही

maratha-morcha-2

मुंबई : ऐतिहासिक मराठा क्रांती मोर्चा आपल्या अखेरच्या टप्प्यात येऊन पोहचला असताना आता आर – पार ची लढाई मुंबई मध्ये होणार आहे. इतके दिवस अर्थात तब्बल ५७ मोर्चानंतर मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी निघणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाच्या पार्श्वभूमीवर सराकरकडून आंदोलनकांशी चर्चा करण्याचा प्रयत्न सुरू आहे. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी मोर्चेकऱ्यांच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी येण्याचं आवाहन केलं होतं. मात्र अजून तरी मराठा क्रांती मोर्चाकडून चर्चेबाबत सरकारला कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. आता नारायण राणे यांनी सरकारशी बोलण्याची तयारी दाखवली आहे पण मराठा मोर्चा समन्वयक रवींद्र काळे पाटील यांनी सरकारसोबत चर्चेचा प्रश्नच येत नसल्याच सांगून सरकारशी बोलण्याची शक्यता धूसर केली आहे . उद्या मोर्चा निघणार असून अद्याप पर्यंत सरकार आणि आंदोलनक यांच्यात कसलीही चर्चा झाली नाहीये त्यामुळे ही चर्चा होणार की नाही याबाबत प्रश्नचिन्ह आहे.