अधिवेशनात पाणी प्रश्नावरून विरोधक आक्रमक, राज्यातील पाणी टंचाईला सरकारचं जबाबदार

blank

टीम महाराष्ट्र देशा : फडणवीस सरकारच्या कार्यकाळातील शेवटचे अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात आज पाणीप्रश्नावरून विरोधक आक्रमक झाले. गतवर्षीच्या पावसाने राज्यातील महत्वाची धरण १०० % भरून सुद्धा सरकारच्या नियोजना अभावी राज्याला दुष्काळ सहन करावा लागत आहे. जर नियोजन असत तर राज्यावर अशी विदारक परिस्थिती आली नसती, असे म्हणत राष्ट्रवादी कॉंग्रेस नेते अजित पवार यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना टोला लगावला आहे.

यावेळी अजित पवार म्हणाले की, गेल्यावर्षी उजनी धरण हे पावसाच्या पाण्याने १०० % भरले होते. तरी देखील आता पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत आहे. सप्टेंबर मध्ये १०० % भरलेले धरण आता -५० % मध्ये गेले आहे. नियोजनाचा सावळा गोंधळ असल्याने आता सोलापूर जिल्ह्याला भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे सरकारने वेळीच कारवाई करावी आणि अधिकाऱ्यांना निलंबित करावे अशी मागणी पवार यांनी केली.

तसेच सभागृहातील अनेक नेते पाणी प्रश्नावरून आक्रमक झाले. कॉंग्रेसच्या आ. प्रणिती शिंदे यांनी देखील सोलापूरची विदारक परिस्थिती मांडत, पाऊस झालाचं नाहीतर सरकारचे इथून पुढचे नियोजन काय असेल, असा सवाल जलसंपदा मंत्र्यांना विचारला आहे. वास्तवात सोलापूरला ८ दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी जनतेला वणवण भटकाव लागत आहे.