मुंबई : एकनाथ शिंदे गट आणि शिवसेनेमधील वाद आता टोकाला गेलायं. सुप्रीम कोर्टात आज एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे गटातील शिवसेना यांच्यातील परस्पर पाच महत्त्वाच्या याचिकांवर सुनावणी झालीयं. एकनाथ शिंदे गट आणि शिवसेनेमधील वादावरती संपूर्ण देशाचे लक्ष आहे. कोर्टामधील सुनावणीवर शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी आता मोठे भाष्य केले आहे.
अरविंद सावंत मिडियाला बोलताना म्हणाले की, एकनाथ शिंदे गटाच्या वकिलांनी कोणताच विषय संविधानात्मक मांडलेला नाहीयं, कायद्याचाही कुठलाही उल्लेख त्यांनी यावेळी केलेला नाहीयं. ते फक्त सातत्याने लाॅजिक मांडत होते…पण हे लक्षात घेणे महत्वाचे आहे की, लाॅजिक चालणार नाहीयं कायदा चालणार आहे. म्हणून न्यायालयाने त्यांच्यावरती ताशेरे ओढले. कोर्टाने त्यांना सांगितले की, आम्ही तुम्हाला 10 दिवस दिले, त्या 10 दिवसात तुम्ही काय केले? मग आता तुम्ही बोलूही नका सरळ निवेदन द्या आणि ते निवेदन आज दिले आहे, असे अरविंद सावंत म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या :
- Arvind Sawant | “कोर्टात लाॅजिक नाही फक्त कायदा चालतो”; कोर्टातील युक्तिवादावर अरविंद सावंत यांची प्रतिक्रिया
- Amol Mitkari |”फडणवीसांच्या नादाला लागून आपण…” ; अमोल मिटकरींचा एकनाथ शिंदेना टोला
- Cricket : ‘हा’ खेळाडू तब्बल ९ वर्ष आणि ३ महिन्यांनी भेटला कुटुंबाला, शेअर केली भावनिक पोस्ट; पाहा PHOTO!
- Anil Desai | आम्हाला न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे, न्याय होईल – अनिल देसाई
- Nitin Gadkari | शहरी नागरिकांची टोलमधून होणार मुक्तता; नितीन गडकरींची मोठी घोषणा
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<