भूमीपुत्रांना न्याय देण्यासाठी शासन कटीबद्ध- रवींद्र चव्हाण

मुंबई, दि. 7; उरण तालुक्यातील जे एन पी टी, सिंगापूर पोर्ट आणि इतर बंदरांमध्ये नोकर भरती करताना भूमीपुत्रांना न्याय देण्यासाठी शासन कटीबद्ध आहे, असे असे बंदरे विकास राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज विधान परिषदेत लक्षवेधी सूचनेला उत्तर देतांना सांगितले.

श्री. चव्हाण पुढे म्हणाले, जे एन पी टी  बंदराच्या उभारणीसाठी उरण तालुक्यातील ज्या स्थानिकांनी जमिनी दिल्या आहेत, त्यांच्या पाल्यांना या प्रकल्पात नोकरी देण्यात येत आहे. त्याच बरोबर इथे नोकरी करण्यासाठी लागणारे कौशल्य विकसीत करण्यात येईल. या प्रकल्पासाठी सन 2022 पर्यंत मनुष्यबळाची आवश्यकता राहणार आहे .

उपरोक्त संदर्भातील लक्षवेधी सदस्य जयंत पाटील यांनी उपस्थित केला होता.