शेतकऱ्यांना चिंता मुक्त करण्याची घोषणा करणारं हे सरकार शेतकऱ्यांना चिंताग्रस्त करत आहे : महाजन

टीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्रातील सगळ्याच शेतकऱ्यांना चिंतामुक्त करु, अशा घोषणा करत महाविकास आघाडीच्या सरकारने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित केल्या होत्या.पण महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर अनेक कामं रखडल्याच्या कारणावरुन माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी उपोषण सुरु केले . त्यातच आता भाजपचे जामनेरचे आमदार गिरीश महाजन यांनी सुद्धा राज्यभर आंदोलन करण्याचा जाहीर  इशारा दिला आहे

हे सरकार स्थापन झाल्यापासून अद्याप कर्जमाफीची रक्कम आणि दुष्काळ निधीची मदत शेतकऱ्यांना मिळालेली नाही. यात भर म्हणून या सरकारच्या काळात मोठ्या प्रमाणावर लोड शेडिंग सुरु झाल्याने शेतकरी अधिक अडचणीत आला आहे. शेतकऱ्यांना चिंता मुक्त करण्याची घोषणा करणारं हे सरकार शेतकऱ्यांना चिंताग्रस्त करत आहेत, असा आरोप आमदार गिरीश महाजन यांनी केला आहे.

Loading...

महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर अनेक कामं सरकार येताच शेतकऱ्यांना कर्जमुक्त करु, चिंतामुक्त करु अशी घोषणा देणाऱ्या सरकारने अद्याप काहीही केलेलं नाही, असं गिरीश महाजन म्हणाले आहेत.

शेतकऱ्यांच्या या सर्व समस्या सरकारने तातडीने सोडवल्या नाहीत, तर भाजपला राज्यभरात रस्त्यावर उतरत आंदोलन करण्याशिवाय पर्याय उरणार नाही, असा इशारा गिरीश महाजन यांनी केला. त्यामुळे पंकजा मुंडे यांच्या पाठोपाठ आता गिरीश महाजनही आंदोलन करण्याच्या तयारीत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

टीकाकारांच्या नाकावर टिच्चून इंदुरीकर महाराजांची मोशीत काढली मिरवणूक
शिवसेनेचा 'ढाण्यावाघ' ऊझबेकिस्थानात
'पुन्हा निवडणुका झाल्यास भाजपाच्या आमदारांची संख्या १०५ वरुन पंधरावर येईल'
इंदोरीकर महाराजांच्या 'त्या' वक्तव्यावर सिंधुताई सपकाळांची लक्ष्यवेधी प्रतिक्रिया
फक्त विधानसभा कशाला लोकसभेच्या देखील निवडणुका घ्या, पवारांनी फडणवीसांना ललकारलं
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
परळीतील 'त्या' प्रकरणातील आरोपींना अटक, कोणाचीही गय केली जाणार नाही - धनंजय मुंडे
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
राजकीय भूकंपाची शक्यता ; भाजपच्या २५ नाराज आमदारांची बैठक
‘सामना’मध्ये छापून आलेल्या नाणार प्रकल्पाच्या जाहिरातीवर मुख्यमंत्री ठाकरेंनी केली भूमिका स्पष्ट, म्हणाले...