मराठीचा अवमान करणा-या सरकारचा धिक्कार- धनंजय मुंडे

dhananjay munde

मुबंई : अर्थसंकल्पीय अधिवेशनाला पहिल्याच दिवशी राज्यपाल सी विद्यासागर राव यांच्या भाषणाचा अनुवाद मराठीत न झाल्यामुळे आमदारांना थेट गुजराती भाषेतून ऐकायला मिळाला. त्यामुळे त्यांच्या भाषणादरम्यानच विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. धनंजय मुंडे यांनी सरकारने मराठी भाषेचा अवमान केल्याची टीका केली आहे.

राज्यपालांचे अभिभाषण मराठीत अनुवादित न करून सरकारने मराठी भाषेचा अवमान केला आहे. मराठीचा अवमान करणा-या सरकारचा धिक्कार असो. अशी घोषणा विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. दरम्यान सरकारने मराठी भाषेचा खून केल्याची टीका विरोधकांकडून होत आहे.

याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाची माफी मागून साबंधीतावर कारवाई करण्याची मागणी अध्यक्षांकडे केली. राज्यपालांच्या अभिभाषणानंतर विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर विरोधकांनी याप्रकरणी राज्यपालांची भेटही घेतली.