fbpx

सरकारने जे.डी.अग्रवाल यांचा बळी घेतला, अण्णांचा देखील घेतील – जलतज्ज्ञ राजेंद्र सिंग

टीम महारष्ट्र देशा – सरकार अण्णाचा जे.डी.अग्रवाल करतील. गंगा आंदोलनात ज्या पद्धतीने जे.डी.यांचा बळी घेतला. तशी आम्हाला भीती आहे. जे.डी. हे तर संघाचे होते़ असं असतानाही सरकारने त्यांचा बळी घेतला. हे तर आण्णा आहेत़ त्यामुळे आम्हाला भीती वाटते, असे जलतज्ज्ञ राजेंद्र सिंग म्हणाले आहेत.

राळेगणसिद्धीमध्ये अण्णांची जलतज्ज्ञ राजेंद्र सिंग, सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी, नंदूरबार येथील आदिवासी नेत्या प्रतिभा शिंदे, कायदेतज्ज्ञ असिम सरोदे यांनी भेट घेतली आहे. यावेळी ते बोलत होते.

लोकपाल कायद्याची अंमलबजावणी, शेतकर्यांचे प्रश्न यासाठी अण्णा हजारे यांचे आंदोलन सुरु आहे़ ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे राळेगणसिद्धी येथे गेल्या सात दिवसांपासून आमरण उपोषण सुरु आहे.

विश्वंभर चौधरी म्हणाले की, सरकारकडून अण्णांच्या मागण्यांबाबत धूळफेक सुरू आहे. गिरीश महाजन येतात़-जातात़ नरेंद्र मोदींचा इगो अशा स्तरापर्यंत पोहचला आहे. की, चर्चा करायला केंद्रातील एकही व्यक्ती पाठवत नाहीत.