fbpx

शेतकऱ्यांच्या अर्धनग्न मोर्चाला सरकारने मुंबई मॅरेथॉनसाठी अडवले

टीम महाराष्ट्र देशा : आपल्या हक्कांसाठी मंत्रालयावर धडकणाऱ्या शेतकऱ्यांच्या अर्धनग्न मोर्चाला राज्य सरकारने मुंबई मॅरेथॉनसाठी अडवले, असल्याची टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारवर केली. ते कन्नड येथील राष्ट्रवादीच्या निर्धार परिवर्तन यात्रेत बोलत होते.

यावेळी अजित पवार म्हणले की, आज पिचलेले शेतकरी मंत्रालयातच आत्महत्या करत आहेत तरी या सरकारला त्याची दखल घ्यावीशी वाटत नाही, हे दुर्दैवी आहे.

पाच राज्यांच्या निवडणुकांनंतर देशात हवा बदललेली आहे. तेच आता आपल्याकडेही झालं पाहिजे. आता जातीचा-पातीचा, नात्याचा-गोताचा विचार करु नका. शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेलं हे सरकार घालवलंच पाहिजे. असेही पवार यावेळी म्हणले.

1 Comment

Click here to post a comment