सरकारने धनगरांची फसवणूक केल्याने आंदोलनाशिवाय पर्याय नाही – शेडगे

पुणे : धनगर समाजाचा उल्लेख धनगड झाल्याने समाज उध्वस्त झाला आहे, यामध्ये दुरुस्ती होण्यासाठी धनगर समाजाचा नेत्यांनी सरकारकडे पाठपुरावा केला, मात्र कोणत्याही सरकारने धनगरांना न्याय दिला नसल्याचा आरोप धनगर नेते माजी आमदार प्रकाश शेडगे यांनी केला आहे. तसेच सरकारने धनगरांची फसवणूक केल्याने आंदोलनाशिवाय पर्याय राहिला नसल्याच शेडगे यांनी सांगितले. उद्यापासून राज्यभरात धनगर समाजाकडून आरक्षणासाठी आंदोलन छेडण्यात येणार आहे. या आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी राज्यभरातील समाज नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी शेडगे बोलत होते.

माजी आमदार प्रकाश शेडगे, जेष्ठ नेते अण्णा डांगे, आ रामहरी रूपनवर, आ राम वडकूते, आ दत्तामामा भरणे, पुणे जिल्हापरिषद अध्यक्ष विश्वास देवकते यांच्यासह राज्यभरातील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

बारामती येथे झालेल्या आंदोलनावेळी तत्कालीन भाजप प्रदेशाध्यक्ष असणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्ता आल्यावर पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत आरक्षण देऊ हे सांगितले होते. मात्र आजवर 250 मंत्रिमंडळ बैठका होऊनही धनगर समाजाचा विषयच निघाला नाही, आरक्षण देणं बाजूला ठेवून गेली चार वर्षे सरकार कडून वेळकाढूपणा केला जात आहे. असा आरोप प्रकाश शेडगे यांनी यावेळी केला आहे.

धनगड आणि धनगर एकच असल्याचे अनेक पुरावे आजवर देण्यात आले आहेत. केंद्र सरकार हे मान्य करत, पण राज्य सरकारला ते मान्य नाही. मराठा समाजासाठी नेमण्यात आलेल्या राणे समितीचा अहवाल न्यायालयात टिकला नाही, त्याप्रमाणे धनगर समाजाच्या स्थितीवर अभ्यास करण्यासाठी नेमलेल्या टाटा सोशल सायन्सचा अहवालही कोर्टात टिकणार नाही. त्यामुळे आता सरकारला वेळ देण्यास समाज तयार नसल्याचा इशारा यावेळी धनगर नेत्यांकडून देण्यात आला आहे.

दरम्यान, यापूढे राज्यात होणारे आंदोलन हे धनगर उग्र असेल, त्यामुळे निर्माण होणाऱ्या कायदा सुवस्थेची जबाबदारी सरकारची असेल, असंही यावेळी सांगण्यात आलं आहे.

काही लोक सरकारला 100 दिवस वेळ देण्याचं सांगत आहेत, पण येत्या सहा महिन्यात आचारसंहिता लागेल त्यामुळे आम्ही सरकारला वेळ देण्यास तयार नाही.

आंदोलनामुळे महाराष्ट्राचे नाव बदनाम होत चाललंय : राणे

पंतप्रधानपदासाठी विराट कोहलीचा विचार करावा लागेल : शरद पवार