fbpx

स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणार सरकार कचर्‍याची व्यवस्था लावू शकत- धनंजय मुंडे

dhanjay munde and aurangabad kachara

औरंगाबाद: औरंगाबाद मध्ये निर्माण झालेल्या कचरा प्रश्नाचा आज २७वा दिवस आहे. पहिल्या दिवशी जी परिस्थिती होती तीच आजही आहे. शहरात सुमारे सात हजार मेट्रिक टन कचरा शहरात जमा झालेला आहे. यामुळे अनेक आजार नागरिकांना व्हायला लागले आहेत. सरकार काय करते आहे. असा सवाल उपस्थित करत विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी सरकारवर हल्लाबोल चढवला.

स्मार्ट सिटीच्या सरकार गप्पा मारणार सरकार शहरातील कचर्‍याची व्यवस्था लावू शकत नाही. कचर्‍याचा प्रश्नामुळे आता कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. कायदा व सुव्यवस्था बिघडली म्हणून पोलीसांनी स्वतःच कायदा घेण्याची पहिलीच घटना औरंगाबादमध्ये घडली आहे. औरंगाबाद मध्ये जनता व प्रशासन असा संघर्ष कचर्‍यामुळे निर्माण झाला आहे. असेही मुंडे म्हणाले.

मनपा आयुक्त  डि. एम. मुगळीकर यांच्यावर कारवाई करा!

औरंगाबादला कचरा प्रश्न गंभीर झाला असतांना मनपाचे आयुक्त मात्र गेले २६ दिवस मनपा कार्यालयातच आलेले नाहीत. घरी बसून मनपाच्या इतर कामांच्या फाईल क्लिअर करत असताना त्यांना शहरातील कचरा क्लिअर करता येत नाही, त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे. कचर्‍यामुळे औरंगाबादकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे.  यावर राज्य सरकार काय करणार आहे ? स्वच्छतेच्या बाबतीत सध्या दिल्ली पासून गल्ली पर्यंत चळवळ सुरु आहे मात्र राज्यातील एका महत्त्वाच्या शहरात कचर्‍याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून सरकार बघ्याची भूमिका घेत आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी आता तरी आपला कणखर पणा दाखवावा!

एक एक राज्य भाजप जिंकत असताना साधा एका शहरातील कचर्‍याचा प्रश्न सोडवता येत नाही ? देवेंद्र फडणवीस यांनी आता तरी आपला कणखर पणा दाखवत औरंगाबादकरांना दिलासा द्यावा. स्वच्छतेच्या बाबतीत दिल्लीपासून गल्लीपर्यंत चळवळ सुरू असताना, राज्यातील महत्त्वाच्या शहरात कचऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. मनपाचे कर्मचारी रात्री अज्ञात स्थळी खड्डा खणून कचरा पुरायला लागले आहेत. त्यामुळे संपूर्ण औरंगाबाद शहर रात्री जागून पहारा देत आहे.