‘अच्छे दिन’ वास्तवात कधीच नसतात, ते मानण्यावर असतात- नितीन गडकरी

नवी दिल्ली: ‘अच्छे दिन’ वास्तवात कधीच नसतात, ते मानण्यावर असतात असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले. ते ‘इंडिया टुडे कॉन्क्लेव’ मध्ये बोलत होते.

नितीन गडकरींना भाजप २०१९ च्या निवडणुकीत ‘अच्छे दिन’ आले असं जनतेला सांगू शकेल का? असा प्रश्न विचरला असता गडकरी म्हणाले, “वास्तवात ‘अच्छे दिन’ नसतात. प्रत्येक व्यक्ती आपल्या सद्य परिस्थितीवर कधीच संतुष्ट नसतो. जो नगरसेवक होतो, तो आमदार झालो नाही म्हणून दु:खी असतो. जो आमदार असतो तो खासदार न झाल्याने दु:खी असतो. खासदार असतो तो मंत्री न झाल्याने दु:खी असतो. मंत्री चांगलं खातं न मिळाल्याने दु:खी असतो. म्हणजे लोक असाच विचार करत असतात. ते स्वत:च्या परिस्थितीवर कधीच समाधानी नसतात. ज्याच्याकडे मर्सिडीज आहे तो दु:खी आहे, ज्याच्याकडे दुचाकी आहे तो सुद्धा दु:खी आहे. त्यामुळे अच्छे दिन हे मानण्यावर असतात”

एकेकाळी मी महाराष्ट्रात रमलो होतो, मला दिल्लीला जायची अजिबात इच्छा नव्हती. मी दिल्लीमध्ये आलो आता मला परत महाराष्ट्रात जायची अजिबात इच्छा नाही असं गडकरी यांनी इंडीया टुडेच्या इंडीया कॉन्क्लेव्ह या कार्यक्रमात सांगितलं.

You might also like
Comments
Loading...