क्रिकेटच्या देवाने कोरोनाला हरवलं; सचिनला रुग्णालयातून डिस्चार्ज

sachin tendulkar

मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याला कोरोनाची लागण झाली होती. याची माहिती स्वत: सचिन तेंडुलकरने ट्विट करुन या दिली. मला सौम्य लक्षणे आढळली असून, माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी काळजी घेत आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्या, असं सचिन तेंडुलकरने म्हटलं होतं.

दरम्यान, सुरुवातीला होम क्वारंटीन राहणार असल्याचं त्याने सांगितलं होतं. मात्र, २ एप्रिलला प्रकृती खालावल्यामुळे वैद्यकीय सल्ल्यानुसार रुग्णालयात दाखल व्हावं लागत असल्याचे त्याने ट्विटद्वारे सांगितलं होतं. जगभरातील लाखो चाहत्यांनी त्याच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केल्या होत्या.

आता सचिनने कोरोनावर मात केली असून एका पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे. ‘थोड्यावेळापूर्वी रुग्णालयातून घरी परतलो. सध्या विलगीकरणात आराम करत आहे. सर्व चाहत्यांनी केलेल्या प्रार्थनेसाठी त्यांचे आभार मानतो. रुग्णालयातील सर्व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे आभार मानतो,’ असं ट्विट सचिन तेंडुलकर याने केलं आहे. दरम्यान, ९ एप्रिलपासून आयपीएल सुरु होणार असून सचिनचा मुलगा अर्जुन तेंडुलकर हा मुंबई इंडियन्सच्या संघाकडून खेळणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या :