दहशतवाद, गरिबी, भ्रष्टाचारमुक्त नव भारताची निर्मिती करण्याचे ध्येय – पंतप्रधान मोदी

नेप्यीता  : दहशतवाद, गरिबी, भ्रष्टाचार, सांप्रदायिकता मुक्त नव भारताची निर्मिती करण्याचे ध्येय असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे सांगितले. म्यानमारमधील भारतीय नागरिकांना ते संबोधित करत होते.

भारत व म्यानमार यांच्यातील भावनात्मक नाते उगडून सांगताना पंतप्रधान म्हणाले की मला लहानपणापासून धार्मिक व आध्यात्मिक शहरात जाण्याची इच्छा होती. यांगून शहरात येऊन माझे ते स्वप्न पूर्ण झाले. भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात म्यानमारची भूमिका, आझाद हिंद सेनेचा इतिहास व विपश्यना यांचा परस्परांशी संबंध आहे.

`नव भारत’ संकेतस्थळाच्या माध्यमातून भारतीयांनी या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहनही पंतप्रधान मोदी यांनी केले. अनेक भारतीय परदेशात भारतीय संस्कृतीचा प्रचार प्रसार करत असून भारताचे नाव उंचावत आहेत. प्रवासी भारतीय प्रवाशांसाठी व्हिसा व अन्य आवश्यक कार्यवाहीसाठी भारतीय दूतावास २४ तास चालू रहाणार असल्याचेही पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. पंतप्रधान मोदी यांच्या भाषणादरम्यान `मोदी, मोदी’च्या घोषणांनी सभागृह दणाणून गेले.