मुलींनी दुपारी ३ नंतर या महाविद्यालयाच्या आवारात थांबू नये

पुणे : कर्वे समाजसेवा संस्था वेगवेगळ्या वादग्रस्त कारणांमुळे सध्या चर्चेत आहे. मनमानी कारभार भरमसाट शुल्कवाढ आदी कारणांमुळे चर्चेत असणाऱ्या या संस्थने आता सुरक्षेच्या कारणास्तव मुलींना दुपारी तीन वाजल्यानंतर संस्थेत थांबता येणार नाही अशी सूचना केली आहे.

सध्या कर्वे समाजसेवा संस्थेतील विद्यार्थी शुल्कवाढ तसेच वसतिगृहा च्या प्रश्नावरून वसतिगृहाबाहेर ठिय्या मांडून बसले आहेत. महाराष्ट्र देशाने विद्यार्थ्यांसोबत चर्चा केल्यानंतर आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. संस्थेत मुलींसाठी वेगळे नियम आहेत. त्यामुळे विद्यार्थिनीना मानसिक त्रासला समोरे जाव लागत. ठिय्या मांडून बसलेल्या विद्यार्थिनींनी सांगितले. महाविद्यालयात मुलींसाठी वेगळे नियम आहेत. आधी मुलींना महाविद्यालयात 6 वाजेपर्यंत थांबता येते होते. आता मात्र फक्त 3 वाजेपर्यंतच थांबता येते.

मुलींनी व्यवस्थापनाला जाब विचारला असता. झोपडपट्टी परिसर असल्यामुळे मुलींना जास्त वेळ थांबता येत नाही. व्यवस्थापनाकडून अशी उत्तर देण्यात येतात. सदर मुली ( एम एस डब्लु ) विभागाच्या आहेत. महाविद्यालयात मुलींनी स्वालंबी होणे, आव्हानांनाचा सामना करणे शिकवण्यात येते,मात्र व्यवस्थापनाकडून याची पायमल्ली होत आहे. व्यवस्थापनाकडून अंमलबजावणी होत नसल्यामुळे मुलींना मानसिक त्रासाला सामोरे जाव लागत आहे. महाराष्ट्र देशाने महाविद्यालयाच्या व्यवस्थापकांशी संपर्क साधला असता कोणताही प्रतिसाद मिळला नाही.

महाविद्यालयात सी सी टीव्ही कँमेरा असतांना मुलींना जास्त कॉलेज मधे थांबता येत नाही. त्यामुळे एम एस डब्लु चे बरेच प्रेक्टिकल आम्ही करू शकत नाही. महाविद्यालयात कॉस्ट कटिंग च्या नावाखाली वर्तमानपत्र सुद्धा बंद केले. शैक्षणिक संस्थेत आमच्या सुरक्षेवरून आम्हाला महाविद्यालत थांबू देत नाहीत. एकीकडे महिलांनी सक्षम बनाव म्हणून वेगवेगळे उपक्रम चालू आहेत. दुसरीकडे शैक्षणिक संस्थेत आम्हाला लढण्यापासून रोखण्यात येत. मात्र आम्ही गप्प बसणार नसून यासंदर्भात आवाज उठवनार आहोत.
नेहा राणे, विद्यार्थिनी