आठव्या मजल्यावरून उडी मारून तरुणीची आत्महत्या

पुणे : पुण्यातील सेनापती बापट रोडवरील साई कॅपिटल या इमारतीच्या आठव्या मजल्यावरून उडी मारून 30 वर्षाच्या तरुणीने आत्महत्या केली आहे. आज संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घटना घडली असून आत्म्हत्येच कारण अद्याप कळू शकलेल नाही.

अश्विनी सुनील लोणकर ( अंदाजे वर ३० रा हडपसर ) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. कामावर असताना तिने आत्महत्या केली असल्याची माहिती मिळत आहे.