मशिदीवरचे भोंगे बंद होत नाहीत, मग हिंदूच्या सणांना आडकाठी का?

मुंबई : मशिदीवरचे रोजचे भोंगे बंद करत नाहीत, मग वर्षातून एकदा येणाऱ्या गणेशोत्सवावेळीच ध्वनिप्रदूषण का आठवते, असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. तसेच दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेश मंडळांनी बिनधास्त साग्रसंगीत गणेशोत्सव साजरा करावा असेही त्यांनी म्हंटले आहे.

हायकोर्टाच्या आदेशानुसार मुंबई महापालिकेकडून गणेश मंडळांना मंडप घालण्यासाठी अटी टाकण्यात आल्या आहेत. तर दक्षिण मुंबई, गिरगाव भागातील गणेश मंडळांना मंडपासाठी परवानगी दिली जात नसल्याची तक्रार करण्यात येत आहे. हाच प्रश्न घेऊन गणेश मंडळांनी मंगळवारी राज ठाकरे यांची भेट घेतली आहे.

गणेशोत्सव केवळ दहा दिवसांसाठी असतो, तरीही त्यात आडकाठी केली जाते. गेल्या ६० ते ७० वर्षेपासून गिरगावात गणेशोत्सव साजरा होत आहे. मात्र आत्ताच तक्रार करण्यात आल्याच, राज ठाकरे यांनी यावेळी सांगितल. तर दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सव साग्रसंगीत साजरा करावा, असं आवाहन त्यांनी केल आहे.

मनसेच्या राज्य सरचिटणीसपदी किशोर शिंदे यांची नियुक्ती

बेकायदा मांडव उभारलेल्या १४० मंडळांना महापालिकेची नोटीस