ऐतिहासिक शहराची केली ‘कचराकुंडी’

garbage-aurangabad

औरंगाबाद / प्रतिनिधी : ऐतिहासिक शहराचे सर्वार्थांने कचराकुंडीत रुपांतर करणा-या महापालिकेला त्वरित बरखास्त करुन कठोर प्रशासनाची नेमणूक करावी. तसेच भ्रष्ट कारभाराची सीबीआयकडुन चौकंशी करण्यात यावी व इतर मागण्यांसाठी मराठवाडा विकास योजनेने शहराच्या मध्यवर्ती भागात आंदोलन छेडले आहे.

अठरा दिवस झाले तरी शहरातील कचराकोंडीचा प्रश्न सुटलेला नाही. नारेगाव येथून कचरा डेपो हलवावा ही मागणी अनेक वर्षापासून आहे. परंतू यावर कोणताही उपाय करण्यात आलेला नाही. खासदार आणि महापौर व इतर पदाधिकां-यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. समांतर पाणी पुरवठा योजना राज्य शासनाच्या जीवन प्राधिकरण व महापालिका प्रशासनाकडून करून घेण्याऐवजी खाजगी कंपण्याच्या घशात ही योजना घालण्याचे उद्योग खासदारांनी चालविले आहेत. आयुक्तापासून ते थेट सर्वौच्च न्यायलयाने व इतर सर्व जबाबदार यत्रणांनी ही योजना खाजगी कपंणीना देऊ नये असे सांगितलेले असतानाही खासदार ऐकत नाहीत.

समांतर पाणी पुरवठा योजनेशिवाय अनेक प्रश्नासबंधी याचिका न्यायलयात दाखल झाल्या आहेत. त्यामध्ये डेंग्यु चिकनगुनीयाचे प्रतिबंध करण्यास अकार्यक्षमता, खड्डे पडलेले रस्ते, नवीन रस्त्याच्या नावाखाली हडपलेला निधी व गटारी नाल्याच्या बोगस कामापासून ते खाबांवरील वरील दिव्यापर्यत कोट्यावधी रुपये स्वतःच्या नरड्यात कोंबणा-या पदधिका-याची व त्यांना आशीर्वाद देणा-या खासदारांची सीबीआयकडून चौकशी करावी, अशी मागणी मराठवाडा विकास सेनेने केली आहे