अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच १३ व्या मिनिटाला कामकाज तहकूब

मुंबई : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आज सुरवात झाली. शेतकऱ्यांना आर्थिक मदत आणि महिलांवरील अत्याचारांच्या वाढत्या घटनांच्या मुद्द्यांवर विरोधकांनी स्थगन प्रस्ताव मांडला. मात्र सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी फेटाळून लावल्यामुळे संतप्त विरोधकांनी घोषणाबाजीला सुरूवात केली. मात्र, या गदारोळातच सभापतींनी पुढील कामकाज पुकारले. विरोधकांच्या गदारोळात अवघ्या १३ व्या मिनिटाला दिवसभराचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले.

महिला अत्याचार आणि शेतकऱ्यांना आर्थिक मदतीच्या मागणीसाठी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी स्थगन प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला शिवसेना सदस्य दिवाकर रावते यांनी हरकत घेतली. विधान परिषद हे स्थायी सभागृह आहे. यापूर्वी सभापती शिवाजीराव देशमुख यांनी प्रश्नोत्तराच्या तासानंतरच स्थगन प्रस्ताव घेण्याचा निर्णय दिला होता. मात्र त्या पाच वर्षात देशमुख यांच्या आदेशाचे पालन झालेले नाही.

Loading...

आम्ही विरोधात आलो म्हणून लगेच प्रथा बदलू नये, अशी मागणी भाजप सदस्य भाई गिरकर यांनी केली. यावर अनेक आदेशांचे पालन झाल्याचे सभापतींनी स्पष्ट सभापतींनी स्थगन प्रस्तावाच्या सूचना फेटाळून लावल्या. यावर संतप्त झालेल्या विरोधकांनी जोरदार घोषणाबाजीला सुरूवात केली.

दरम्यान, या गदारोळातच २०१९-२० सभापतींनी पुढील कामकाज पुकारले. त्यामुळे अवघ्या १३ व्या मिनिटाला सर्व नियोजित कामकाज गदारोळात पूर्ण झाले आणि सभापतींनी दिवसभराचे कामकाज संपल्याची घोषणा करत कामकाज तहकूब केले.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

कोरोनाला घालवण्यासाठी देशाला 21 नाही तर 49 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज !
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
रुग्णालयाची अवस्था पाहून तुकाराम मुंढेंचा संताप; जमत नसेल तर घरी जा...
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
निलंग्यातील मज्जीदमधून १२ परप्रांतीय पोलिसांच्या ताब्यात !
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका
...त्यामुळे भारताला कोरोनापासून अमेरिके इतका धोका नाही, या तज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले मत
माझं शरीर आहे, माझी मर्जी मी माझ्या शरीरासोबत तेच करेन ! जे मला योग्य वाटतं
सावधान ! कोरोनाचे नवे केंद्र झोपडपट्टीत, अनेकजण सापडले कोरोनाबाधित
कोरोना व्हायरस संदर्भात भारतीय शास्त्रज्ञांना मोठं यश