fbpx

ब्रेकिंग : पुन्हा पूर्ण बहुमत सरकार येणार – नरेंद्र मोदी

टीम महाराष्ट्र देशा : दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयात भाजप अध्यक्ष अमित शहा आणि नरेंद्र मोदी ही पत्रकार परिषद सुरु आहे. या पत्रकार परिषदेत जगाला प्रभावित करता येईल अशा अनेक गोष्टी भारतात असल्याचे मत नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं आहे. तर देशात पुन्हा पूर्ण बहुमत सरकार येणार असल्याचा विश्वास देखील नरेंद्र मोदींनी व्यक्त केला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान येत्या १९ तारखेला होणार आहे. त्यामुळे आज सायंकाळी प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. याचदरम्यान दिल्लीत भाजप मुख्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शहा यांची पत्रकार परिषद सुरु आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान झाल्यानंतर मोदींची पहिली पत्रकार परिषद घेत आहेत. दरम्यान जगाला प्रभावित करता येईल अशा अनेक गोष्टी भारतात असल्याचे मत नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं आहे. तर देशात पुन्हा पूर्ण बहुमत सरकार येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्याचबरोबर जितकं लवकर शक्य असेल तितक्या लवकर नवं सरकार आपलं काम सुरु करेल अस देखील नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.

तसेच दुसरीकडे दिल्लीतच कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचीही पत्रकार परिषद सुरु आहे. यादरम्यान राहुल गांधी यांनी मोदींच्या पत्रकार परिषदेवरून निशाणा साधला. पंतप्रधान मोदींची पत्रकार परिषद ही अभूतपूर्व घटना आहे. पंतप्रधान मोदी जिथे पत्रकार परिषद घेत आहेत, त्या खोलीचा दरवाजा बंद केला आहे. मी काही पत्रकारांना सांगितलं की आमच्या वतीने काही प्रश्न विचारा, पण त्यांना परवानगी दिली नाही. असा आरोप राहुल गांधी यांनी केला. याचबरोबर पत्रकार परिषदेत मला कठीण प्रश्न विचारले जातात आणि मोदींना कपडे कसे घालतात, आंबे कसे खातात असे प्रश्न विचारले जातात. असे राहुल गांधी यांनी म्हंटले