मुंबई : अँटिलिया स्फोटक प्रकरण आणि त्या अनुषंगाने उलगडलेलं वसुली प्रकरणावरुन चर्चेत असलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह काही महिन्यांपासून जणू बेपत्ता आहेत. ते कुठे गेले? या बाबत पोलिसांनाही ठोस माहिती नसल्याचं सांगितलं जात आहे. या पार्श्वभूमीवर आता काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी परमबीर सिंह कुठे आहेत या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. याबाबत एक ट्वीट संजय निरुपम यांनी केलं आहे.
हे मुंबई पोलिसांचे माजी पोलिस आयुक्त. मंत्र्यावर खंडणी वसुलीचा आरोप लावला होता. स्वत: पाच प्रकरणात वॉन्टेड आहेत. पोलिसांनी म्हटलं आहे की हे फरार आहेत. माहिती मिळाली आहे की ते बेल्जियमला आहेत. ते बेल्जियमला कसे गेले? यांना कुणी रस्ता मोकळा करुन दिला? आपण अंडरकव्हर अधिकारी पाठवून त्यांना परत आणू शकत नाहीत का?, असं संजय निरुपम म्हणाले आहे.
मुंबई क्राइम ब्रँचने केलेल्या अर्जावर कारवाई करताना मुंबईमधील एका न्यायालयाने परमबीर सिंह यांच्याविरोधात अजामिनपात्र वॉरंट जारी केले आहे. परमबीर सिंह यांच्याबरोबरच कोर्टाने विनय सिंह आणि रियाझ भाटी यांच्याविरोधातही अजामिनपात्र वॉरंट जारी केले आहे.
परमबीर सिंह मुंबईचे पोलीस आयुक्त असतानाच अँटिलिया बॉम्ब प्रकरण समोर आले होते. त्या प्रकरणात सचिन वाझे यांना अटक केल्यानंतर परमबीर सिंह यांनाही मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरून हटवण्यात आले होते. त्यानंतर परमबीर सिंह सुट्टीवर गेलेल होते. तसेच त्यांनी तत्कालिन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपये वसुलीचं टार्गेट दिल्याचा आरोप केला होता. तेव्हापासून परमबीर सिंह फरार आहेत.
ये हैं मुंबई पुलिस के पूर्व पुलिस कमिश्नर।
मंत्री पर हफ्ता वसूली का आरोप लगाया था।
खुद पाँच मामलों में वांटेड हैं।पुलिस ने कहा है कि ये फरार हैं।
पता चला है,ये बेल्जियम में है।
बेल्जियम गया कैसे?
इसे किसने सेफ पैसेज दिया?
क्या हम अंडरकवर भेजकर इसे ला नहीं सकते ?#ParambirSingh pic.twitter.com/NwYMh6vV74— Sanjay Nirupam (@sanjaynirupam) October 30, 2021
महत्त्वाच्या बातम्या
- पुढचा महापौर राष्ट्रवादीचाच; निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे सुप्रिया सुळेंचे आदेश
- पुणे महापालिका निवडणुकीच्या रिंगणात विनायक मेटेंची एन्ट्री; स्वबळावर की भाजपसोबत?
- त्या मुलाकडे काहीच सापडलं नाही मग त्याला एवढे दिवस अटक का?; आर्यन खान प्रकरणी सप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
- कोर्टात जा, पण बदनामी करू नका; ज्ञानदेव वानखेडेंचा नवाब मलिकांना सल्ला
- शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करणाऱ्या ‘या’ 10 नगरसेवकावर मोठी कारवाई!
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<