fbpx

भारतीय संघाच्या डोकेदुखीत वाढ; भुवनेश्वर कुमार विश्वचषकाला मुकण्याची शक्यता

टीम महाराष्ट्र देशा : क्रिकेट वर्ल्ड कप २०१९ मध्ये भारताला दुसरा मोठा धक्का बसला आहे. वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार काही दिवसांपूर्वी दुखापतग्रस्त झाला होता परंतु आता त्याची दुखापत ही गंभीर असून तो या विश्वचषकाला मुकणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे भारतासाठी हा मोठा धक्का आहे.

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यादरम्यान भुवनेश्वर कुमारला पायाचे स्नायू ताणले गेल्याने मैदान सोडून जावे लागले होते. त्यानंतर त्याची दुखापत फारशी गंभीर नसल्याच वृत्त आले होते. परंतु आता त्याची दुखापत गंभीर असल्याची सांगण्यात येत आहे. त्यामुळे भुवनेश्वर कुमार वर्ल्ड कपला मुकण्याची शक्यता आहे. याबाबत अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

दरम्यान, याआधीही सलामीवीर शिखर धवनलाही दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली होती. आणि आता भुवनेश्वर कुमारच्या दुखापतीमुळे भारतीय संघाच्या चिंतेत वाढ झाली आहे. शिखर धवनच्या जागी यष्टीरक्षक रिषभ पंत याला संधी देण्यात आली आहे परंतु त्याला अंतिम अकरात संधी देण्यात आलेली नाही. आता भुवनेश्वरच्या जागी कुणाला संधी मिळेल हे पाहन महत्वाच ठरणार आहे.