हज अनुदान बंद करणाऱ्या भाजपचे ख्रिश्चन समुदायाला मोफत जेरुसलेम दौऱ्याचे आश्वासन

the-free-jerusalem-tours-assurance-of-the-christian-community-from-bjp

केंद्र सरकारकडून मुस्लीम समुदायाला देण्यात येणारी हज सबसिडी सरकारकडून बंद करण्यात आली आहे. हा निर्णय होवून आणखीन एक महिनाही पूर्ण झालेला नसताना नागालँडमध्ये सत्तेमध्ये आल्यास ख्रिश्चनधर्मियांना मोफत जेरुसलेम दौरा घडवण्याचे आश्वासन भाजपकडून देण्यात आल आहे. हे आश्वासन म्हणजे मतदारांना खुश करण्याचा प्रयत्न असल्याच दिसत आहे. ईशान्य भारतातील काही वृत्तसंस्थांनी याबद्दलचे वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

ईशान्य भारतातील मेघालय, नागालँड आणि त्रिपुरा या राज्यांच्या निवडणुकांचा प्रचार सध्या रंगात आला आहे. मतदारांना खुश करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून वेगवेगळी प्रलोभने दिली जात आहेत. मेघालयमध्ये 75 टक्के तर नागालँडमध्ये 88 टक्के लोक ख्रिश्चन आहेत

दरम्यान या बद्दलचे वृत्त प्रसिद्ध होताच एमआयएम खासदार असदुद्दिन ओवेसी यांनी भाजपाच्या या निर्णयावर टीका केली आहे. तर भाजपचा हे संधीसाधू राजकारण असल्याची टीका विरोधी पक्षांकडून केली जात आहे.