देशभक्तीचा पाया माझ्या चौथी इयत्तेतचं घातला गेला : धर्मेंद्र

टीम महाराष्ट्र देशा : सध्या देशभरात लोकसभा निवडणुकांचा जोरदार प्रचार सुरु आहे. यातच आता प्रसिध्द ज्येष्ठ अभिनेते धमेंद्र हे निवडणुकीच्या प्रचाराच्या रिंगणात उतरले आहेत. मथुरा लोकसभेच्या जागेवर निवडणुक लढवत असलेल्या आपली पत्नी हेमा मालिनी यांच्या प्रचारासाठी मतदारसंघात लोकांना मतदानाचे आवाहन केले. तसेच यावेळी त्यांनी स्वत: शेतकर्याचा मुलगा असल्याचे सांगितले.

प्रचारावेळी सर्वसामान्यांशी संवाद साधताना धर्मेंद्र त्यांनी सांगितले की, मीही तुमच्यातलाच एक आहे. जेंव्हा मी चार वर्षाचा होतो तेंव्हा देशात इंग्रजांचे राज्य होते. त्यावेळी माझे वडील शेती करत होते तसेच ते शाळेत शिक्षकही होते. त्यावेळी माझी आई माझ्या हातात तिरंगा द्यायची आणि म्हणायची की, स्वातंत्राच्या युध्दात तू पण जा. तेंव्हा मी रस्त्यावर धावत इंकलाब जिंदाबादच्या घोषणा द्यायचो असे सांगितले. तेंव्हा वडील म्हणायचे तुझ्यामुळे माझी नोकरी जाईल. त्यावर आई म्हणायची की नोकरी गेली तरी चालेले मात्र मी माझ्या मुलाला देशभक्त बनवणारचं. त्यामुळे देशभक्तीचा पाया माझ्या चौथी इयत्तेतच घातला गेला.