रोहितला कर्णधार करण्यामागचे माजी दिग्गजाने सांगितले ‘हे’ कारण 

rohit

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू मदन लाल विभाजित कर्णधारपदाच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार रोहित शर्माला मर्यादित षटकांच्या फॉरमॅटमध्ये भारतीय संघाचे कर्णधारपद दिले पाहिजे. जेणेकरून विराट कोहलीवरील दडपण कमी होईल. विराटच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने आतापर्यंत एकही आयसीसी स्पर्धा जिंकलेली नाही. त्यामुळे आयसीसी टी -20 विश्वचषकानंतर विराटला तिन्ही स्वरूपांमध्ये कर्णधार म्हणून कायम ठेवण्याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो.

मदन लाल म्हणाला, ‘हा एक चांगला पर्याय असेल. आम्ही याक्षणी अधिक चांगल्या स्थितीत आहोत. आम्ही भाग्यवान आहोत की आमच्याकडे रोहित आहे आणि जेव्हा जेव्हा विराट कोहलीला असे वाटते की त्याला एक किंवा दोन फॉरमॅटमध्ये लक्ष केंद्रित करायचे आहे, तेव्हा रोहित कर्णधारपद स्वीकारू शकतो. रोहितला खूप अनुभव देखील आहे, मला वाटते भारताला त्याचा फायदा होईल.’

तो पुढे म्हणाला, ‘मी वाचले आहे की कोहली कदाचित वनडे आणि टी -20 चे कर्णधारपद सोडून देईल कारण त्याला त्याच्या फलंदाजीवर लक्ष केंद्रित करायचे आहे जी एक चांगली योजना आहे. मला माहित नाही की ही फक्त एक अफवा आहे की काय, पण तेथे भारतासाठी विभाजित कर्णधारपदाची योजना आहे. कोहली सध्या काय विचार करत आहे यावर अवलंबून आहे. भारत एक संघ म्हणून चांगले काम करत आहे आणि इंग्लंडमध्ये आपण ते पाहिले.’

महत्त्वाच्या बातम्या