fbpx

अबब ! माजी पंतप्रधानाच्या पोऱ्या भाजपातंं

amit shaha

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीतल्या भाजपच्या घवघवीत यशानंतर देशातल्या अनेक राजकीय पक्षांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. त्यामुळे वैयक्तिक राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी देशातील अनेक नेत्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. तर आज माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांचा मुलगा आणि समाजवादी पक्षाचे नेते नीरज शेखर यांनी भाजपात प्रवेश केला आहे.

नीरज शेखर यांनी राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यावेळीच ते भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा दिल्लीतील राजकीय वर्तुळात सुरू झाली होती. मंगळवारी दुपारी भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस भूपेंदर यादव हे यावेळी उपस्थित होते.

दरम्यान लोकसभा निवडणुकीत नीरज शेखर बलिया लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक होते. पण समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी त्यांना उमेदवारी नाकारली होती. तेव्हापासूनच ते नाराज होते, अशी माहिती एका नेत्याने दिली.