India vs Pakistan । नवी दिल्ली : पाकिस्तानचा माजी सलामीवीर आमिर सोहेल याने भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज सूर्यकुमार यादव बाबत मोठी प्रतिक्रिया दिली आहे. भारतीय संघातील सूर्यकुमार यादवचे नाव सर्वजण घेत आहेत. पण मी त्याला पाकिस्तानसाठी मोठा धोका मानत नाही, असे त्याने म्हटले आहे. याचे कारण म्हणजे तो व्हिव्ह रिचर्ड्सप्रमाणे प्रत्येक दिवशी फलंदाजी करू शकत नाही.
आमिर सोहेल सूर्यकुमार यादवला मोठा धोका मानत नाहीत. तो म्हणाला, ‘मी जे बोललो ते पाकिस्तानची गोलंदाजी समोर ठेवून बोललो. पाकिस्तानची गोलंदाजी समोर ठेवा. मी पाकिस्तान संघासोबत जाणार आहे. भारताच्या संघात खूप टॅलेंट आहे. पण तुम्ही माझ्यासमोर सूर्यकुमार यादव किंवा इतर कोणत्याही खेळाडूचे नाव घेतले तर मी पाकिस्तान संघाचा कर्णधार असेन तर मला काही अडचण येणार नाही.
कारण दररोज तुम्ही विव्ह रिचर्ड्ससारखी फलंदाजी करू शकत नाही. त्याच एक नाव होतं. मात्र विराट कोहली आणि रोहित शर्मा हे धोकादायक खेळाडू आहेत. असं तो म्हणाला. तसेच भारतीय संघाला विजय मिळवण्यासाठी सूर्यकुमार यादवची वाटचाल खूप महत्त्वाची आहे. मधल्या फळीत संघाला त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल.
दरम्यान, सूर्यकुमार यादवबद्दल बोलायचे झाले तर तो सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवाननंतर भारताचा सूर्यकुमार या वर्षी टी-20मध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. गेल्या काही महिन्यांत त्याने भारतासाठी अनेक सामने एकट्याने जिंकले आहेत. मधल्या फळीतील भारताचा फलंदाज सूर्यकुमारकडे मैदानाभोवती फटके खेळण्याची क्षमता आहे आणि ही प्रतिभा त्याला जगभरातील उर्वरित T20 फलंदाजांपेक्षा वेगळे करते. या स्पर्धेत सूर्यकुमारची बॅट चालली तर तो संघाला विजेतेपद मिळवून देऊ शकतो, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
महत्वाच्या बातम्या :
- Ram Shinde | “चॉकलेटवर सगळेच…”, रोहित पवारांच्या टीकेला राम शिंदेंचा पलटवार
- Raju Patil । “मनसे भाजपा-शिंदे गटासोबत युती करणार का?”; राजू पाटील म्हणाले…
- Chandrakant Khaire | “उद्धव ठाकरेंचा दौरा फक्त 24 मिनिटांचा” म्हणणाऱ्या अब्दुल सत्तारांना चंद्रकांत खैरेंचे प्रत्युत्तर म्हणाले…
- India vs Pakistan । रोहित शर्माने नाणेफेक जिंकली, पाकिस्तान प्रथम फलंदाजी करणार
- Ola Electric Scooter | Ola ची ‘ही’ नवीन इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात लाँच