‘या’ माजी IAS अधिकाऱ्याला आला इम्रान खानचा पुळका,शांततेचं ‘नोबेल’ मिळावं अशी केली मागणी

श्रीनगर : पाकिस्तानी संसंदेमध्ये इम्नान खान यांना शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार दिला जावा असा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे .मात्र आता भारतातून देखील खान यांना शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार दिला जावा अशी मागणी झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ही मागणी कोण्या सामान्य नागरिकाने किंवा मुरब्बी नेतेमंडळ यांनी नव्हे तर शाह फैजल या माजी आयएएस अधिकाऱ्यांनं ही मागणी केली आहे.

दरम्यान, सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढत आहेत. एकाबाजूला पाकिस्तानी पंतप्रधानांचे शाह फैजल कौतुक करत आहे तर दुसऱ्या बाजूला, पाकिस्तानी सैनिकांच्या आश्रयाने वाढलेल्या दहशतवाद्यांच्या गोळीबारात जम्मू -काश्मीरमधील हंदवाडा येथे आज पाच जवान शहीद झाले आहेत. तर एक नागरिक ठार झाला आहे.

कोण आहे शाह फैजल?

2010मध्ये युपीएससीत देशात अव्वल येण्याचा मान शाह फैजल यांनी मिळवला होता. अशी कामगिरी कामगिरी करणारा शाह फैजल काश्मीरमधील पहिला विद्यार्थी होता.पुढे सरकारच्या ध्येय – धोरणांवर नाराजी व्यक्त करत फैजल यांनी पदाचा राजीनामा दिला.आता हे महाशय लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात देखील उतरणार असल्याची चर्चा आहे.