‘सर जडेजा’चा फॉर्म कायम ; प्रॅक्टीस मॅचमध्ये केली ‘अशी’ कामगिरी

jadeja

इंग्लंड : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (डब्ल्यूटीसी) च्या अंतिम सामन्यापूर्वी टीम इंडियाने शुक्रवारीपासून साऊथॅम्प्टनमध्ये सराव सुरु केला. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात डब्ल्यूटीसीचा अंतिम सामना 18-22 जून दरम्यान साऊथॅम्प्टन येथे होईल. अंतिम सामन्याआधी टीम इंडियाने स्वत: ची तयारी करण्यासाठी इंट्रा-स्क्वॉड (त्यांच्याच खेळाडूंमधील) सामने खेळत आहे. हा सामना 4 दिवसांचा आहे. एका संघाची कमान विराट कोहलीकडे सोपविण्यात आली आहे, तर दुसर्‍या संघाचे नेतृत्व अजिंक्य रहाणे करत आहे.

प्रॅक्टीस मॅचच्या तिसऱ्या दिवशी जडेजानं जोरदार बॅटींग केली. बीसीसीआयनं तिसऱ्या दिवसाच्या खेळाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये जडेजा इशांत शर्माच्या बॉलवर चांगला फटका मारताना दिसत आहे. ऑस्ट्रेलियात फॉर्मात असलेल्या जडेजाचा इंग्लंड मध्येही फॉर्म कायम आहे. जडेजानं इंग्लंडमधील प्रॅक्टीस मॅचचा तिसरा दिवस गाजवला. जडेजानं 76 बॉलमध्ये नाबाद 54 रनची खेळी केली. तर बॉलिंगमध्ये मोहम्मद सिराजचा दिवस होता. त्याने 22 रन देऊन 2 विकेट्स घेतल्या.

२०१९ पासुन सुरु असलेली जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धा अंतिम टप्पयात पोहोचली आहे. न्युझीलंड आणि भारत दोन्ही संघ इंग्लंडमध्ये पोहोचले आहेत .न्युझीलंडचा संघ सध्या इंग्लंडविरुद्ध कसोटी सामना खेळत आहे. तर भारतीय संघ आपपासात सराव सामना खेळत आहे. दोन्ही संघ अंतिम लढतीसाठी सज्ज आहेत.

महत्वाच्या बातम्या 

IMP