‘दिवा विझताना जसा फडफडतो तशी खासदार बारणे यांची फडफड सुरु आहे’

टीम महाराष्ट्र देशा : ‘माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पूत्र पार्थ पवार यांच्याकडे आम्ही युवा नेतृत्व म्हणून पाहतो. ते मावळ मतदार संघातून निवडणूक लढविणार असल्याचे निश्चित नाही. कार्यकर्ते त्यांचे फलक लावत आहेत. पार्थ यांची फलकावर छबी झळकताच शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी त्यांची धास्ती घेतली आहे. प्रत्यक्षात पार्थ निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यास बारणे मावळच काय तर ‘गुगल’वर शोधले तरी सापडणार नाहीत, तसेच बारणे यांचा खासदारकीचा कार्यकाळ संपत आला असून दिवा विझताना जसा फडफडतो तशी बारणे यांची फडफड सुरु आहे,असं म्हणत पिंपरी चिंचवड महापालिकेतील विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी बारणे यांना प्रत्युत्तर दिले आहे.

Loading...

गेल्या काही दिवसांपासून मावळ मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांचे पूत्र पार्थ पवार निवडणूक लढवणार असल्याचे बोलले जात आहे.तशी त्यांनी मावळ मतदारसंघातून मोर्चेबांधणी करायला सुरवातही केली असल्याचे चर्चेत आहे.त्या पार्श्वभूमीवरच पत्रकारांनी गुरुवारी शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांना विचारले असता त्यांनी कोण पार्थ पवार, आपण ओळखत नाही. कोणी फलकबाजी करून नेता होत नाही. पवार घराण्यातील कोणही उमेदवार असला तरी मावळचा पुढचा खासदार मीच असणार, असं ठणकावून बारणे यांनी त्यावेळी सांगितले होते. त्याला आता राष्ट्रवादीचे दत्ता साने यांनी जशाच तसे उत्तर दिले आहे.Loading…


Loading…

Loading...