राज्य बोर्डाच्या १० वी, १२ वीच्या परीक्षांच्या निश्चित तारखांबद्दल महत्वाची माहिती !

ssc

मुंबई : काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने सीबीएसई बोर्डाच्या १० वी, १२ वी परीक्षांच्या निश्चित तारखा घोषित केल्या होत्या. यानंतर राज्य बोर्डाच्या म्हणजेच एसएससी व एचएससी बोर्डाच्या परीक्षांच्या निश्चित तारखांबद्दल विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये उत्सुकता आहे. योग्य नियोजन करून अभ्यास त्या पद्धतीने सुरु करता याव्यात यासाठी तारखांची घोषणा होणे महत्वाचे आहे.

दरम्यान, या आधी राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावीच्या परीक्षा 1 मे तर बारावीच्या परीक्षा 15 एप्रिलनंतर घेण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. या संबंधिची सर्व तयारी पूर्ण झाली असून या आठवड्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखेची घोषणा करण्यात येईल असे संकेत महाराष्ट्र राज्य बोर्डाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी दिले आहेत.

विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांना त्यासंबंधी तयारी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा या दृष्टीने तारखा जाहीर करण्यात येतील असं देखील ते म्हणाले आहेत. सद्या दहावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाने मोठा दिलासा दिला आहे. नियमित विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीनं 23 डिसेंबर 2020 ते 11 जानेवारी 2021 दरम्यान अर्ज भरण्याची मुदत दिली होती. मात्र, विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणींना सामोरं जावं लागत असल्यानं बोर्डाने मुदत वाढवून दिली आहे.

आता २५ जानेवारीपर्यंत नियमित विद्यार्थ्यांना अर्ज भरता येणार आहे. यासाठी अधिकचे शुल्क देखील आकारण्यात येणार नाही. अर्ज www.mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावरून भरता येईल. तर, पुनर्परीक्षार्थी वा खासगी विद्यार्थी 12 जानेवारी ते 25 जानेवारी 2021 दरम्यान प्रचलित पद्धतीनं ऑनलाइन अर्ज भरू शकतील.

महत्वाच्या बातम्या