पाच डायलिसिस युनिट लवकरच येणार…

सोलापूर : सिव्हिल हॉस्पिटलमध्ये डायलिसिस युनिट सुरू करावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात होती. त्यानुसार आरोग्य विभागाकडून चार शासनाकडून एक असे एकूण पाच डायलिसिस युनिट लवकरच येणार आहेत. गरजूंना याचा लाभ होणार आहे. सिव्हिल आरोग्य विभागाकडून चार युनिट मिळतील.

प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. येत्या दोन महिन्यांत आरोग्य विभागाच्या चार मशीन दाखल होतील. परंतु शासनाकडून मिळणाऱ्या मशीनला विलंब लागणार आहे. सप्टेंबर रोजी वैद्यकीय शिक्षण विभागाची बैठक आहे. त्या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे. डायलिसिस युनिट बसवण्याची सोय ब्लॉक येथे करण्यात येणार आहे. त्यानुसार इमारत दुरुस्ती, वीजपुरवठा इतर गोष्टींची सुविधा केली जाणार आहे.

या सुविधा निर्माण करण्यासाठी सेवाभावी संस्था, लोकप्रतिनिधींची मदत घेणार आहे. त्यामुळे येत्या सहा महिन्यांत प्रक्रिया पूर्ण होईल. परंतु यासाठी लवकरात लवकर डायलिसिस युनिट येणे गरजेच आहे, अशी माहिती अधिष्ठाता डॉ. सुनील घाटे यांनी दिली.