‘शेत तिथे रस्ता’ या अभियानाचा पहिला टप्पा पूर्ण; ग्रामसमृद्धी अभियानाला असाच पाठींबा द्या, आ. अभिमन्यू पवार यांचे आवाहन

लातूर: शेत तिथे रस्ता या अभियानाचा पहिला टप्पा अत्यंत यशस्वी झाला आहे. ३०-४० वर्ष जुन्या रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत. जितक्या भक्कमपणे शेतरस्ते अभियानाच्या पाठिशी उभे राहिलात तितक्याच ताकदीने मनरेगातून ग्रामसमृद्धी अभियानाच्या पाठिशी उभे रहा असे आवाहन यावेळी आमदार अभिमन्यू पवार यांनी शेतकरी बांधवांना केले.

मनरेगातून ग्रामसमृद्धी अभियानाअंतर्गत आज दि. ९ जून रोजी नदी हत्तरगा, कोकळगाव, कोकळगाववाडी, मुदगड ए व सरवडी या गावांना आमदार अभिमन्यू पवार यांनी भेट देऊन शेतकरी बांधवांशी संवाद साधला. ‘शेत तिथे रस्ता’ या अभियानाचा पहिला टप्पा अत्यंत यशस्वी झाला आहे. या अभियानाअंतर्गत ३०-४० वर्ष जुन्या रस्त्यांची कामे यशस्वीपणे पूर्ण झाली आहेत.

‘शेत तिथे रस्ता’ या अभियानाला जितक्या भक्कमपणे शेतरस्ते अभियानाच्या पाठिशी उभे राहिलात तितक्याच ताकदीने मनरेगातून ग्रामसमृद्धी अभियानाच्या पाठिशी उभे रहा असे आवाहन यावेळी शेतकरी बांधवांना आ. पवार यांनी केले. तसेच येथील सरवडी येथे मंदिर परिसरात वृक्षारोपण देखील करण्यात आले. यावेळी सरपंच, उपसरपंच, पंचायत समिती सदस्य तसेच इतर अधिकारी व शेतकरी बांधव उपस्थित होते.

महत्त्वाच्या बातम्या

IMP