16 फेब्रुवारीला जिल्हा परिषदेच्या पहिल्या टप्प्याचं मतदान

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचं उद्या गुरूवारी 16 फ्रेब्रुवारीला मतदान होणार आहे.

 

मराठवाडा: परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, औरंगाबाद, जालना

विदर्भ: बुलडाणा, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली

खानदेश: जळगाव

पश्चिम महाराष्ट्र: अहमदनगर

या 15 जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील एकूण 165 पंचायत समित्यासाठी गुरुवारी मतदान होणार आहे. तर याचा निकाल 23 फेब्रुवारीला जाहीर होणार आहे. या सर्व जिल्हा परिषदांची मुदत 21 मार्च 2017 रोजी; तर पंचायत समित्यांची मुदत 13 मार्च 2017 रोजी संपत आहे.