अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी जाहीर होणार

मुंबई : महाराष्ट्र राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून (ता. २४) सुरवात झाली आहे. येत्या ६ मार्चला अर्थमंत्री अजित पवार राज्याचा अर्थसंकल्प सादर करतील. महाविकास आघाडी सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. २० मार्चपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे. या अधिवेशनात एकूण ६ अध्यादेश आणि १३ विधेयकं मांडण्याचं सरकारचं नियोजन आहे.

या अधिवेशनात नगर परिषदांच्या प्रत्येक प्रभागातून केवळ एका सदस्याची निवड करणं, नगराध्यक्षांची निवड पूर्वीप्रमाणे नगरसेवकांमधून करणं, सरपंचांची निवडणूक पूर्वीप्रमाणेच ग्रामपंचायत सदस्यांमधून करणं आणि कृषी उत्पन्न बाजारसमित्यावरील शेतकऱ्यांची पूर्वीप्रमाणे अप्रत्यक्ष निवड करणं यासारख्या विधेयकांचा समावेश आहे. तसेच ‘महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा प्रत्यक्ष लाभ आजपासून सुरू होणार असून पहिल्या टप्प्यात प्रत्येक जिल्ह्यातील दोन गावांमधील पात्र लाभार्थींची यादी लावण्यात येईल. दुसऱ्या टप्प्यातील गावांची यादी २८ फेब्रुवारीपासून लावण्यात येईल’, अशी घोषणा मुख्यमंत्री ठाकरे यांनी केली.

Loading...

त्याचप्रमाणे, अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची पहिली यादी जाहीर करणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलं आहे. त्यामुळे विरोधकांची अडचण होण्याची शक्यता आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत ठाकरे सरकारने ही घोषणा केली.

दरम्यान, पहिल्या यादीमध्ये प्रत्येक जिल्ह्यातील दोन गावांचा समावेश असून, 20 हजार शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात येणार आहे. तसेच 35 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफीची माहिती आली असून, आम्ही फक्त घोषणा नाही तर कामं केली आहेत, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी लगावला. कर्जमुक्तीची यादी आम्ही पुढे पुढे घेत जाऊन ही योजना आम्ही तीन महिन्यात पूर्ण करु, असे सांगत मागील काळातली कर्जमाफी आतापर्यंत चालू असल्याची टीकाही मुख्यमंत्र्यांनी केली.

 

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
कोरोनाला घालवण्यासाठी देशाला 21 नाही तर 49 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज !
चीनने पाकिस्तानची केली क्रूर चेष्टा; N-95 मास्क ऐवजी चक्क अंडरवेअर पासून बनविलेले मास्क पाठवले
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
तळीरामांना दारूवाचून राहावेना; पठ्ठ्यांनी 'यूट्यूब'वर पाहून घरीच तयार केली दारू
आज सांयकाळी आणि उद्या सकाळी दुध मिळणार नाही कारण.....
कोरोनामुळे उद्धव ठाकरे सरकारचे भवितव्य टांगणीला ; वाचा 'काय' आहे प्रकरण
निलंग्यातील मज्जीदमधून १२ परप्रांतीय पोलिसांच्या ताब्यात !
अमेरिकेत 'कोरोना'चं थैमान; डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदींकडे मागितला 'मदतीचा हात'
... तर 'लॉकडाऊन'चा कालावधी वाढवावा लागेल; राजेश टोपे यांची माहिती