fbpx

‘मकालू’ शिखर सर करणारी प्रियांका ठरली पहिली भारतीय महिला गिर्यारोहक

टीम महाराष्ट्र देशा : सातारकरांसाठी एक अभिमानाची बातमी आहे. सातार कन्या आणि गिर्यारोहक प्रियांका मोहिते हिने मकालू हे जगातलं पाचव्या क्रमांकाचं उंच शिखर सर करुन भारताची आणि सातारकरांची मान उंचावली आहे. आठ हजार मीटर्सपेक्षा अधिक उंची असणार मकालू शिखर सर करणारी प्रियांका ही पहिली भारतीय महिला गिर्यारोहक ठरली आहे.

प्रियांका मोहिते हिने 15 मे 2019 रोजी मकालू शिखर सर करत हा विक्रम घडवला. हे ध्येय गाठ्न काही सोप नव्हत. मात्र प्रियांका मोहितेने आपल्या प्रबळ इच्छा शक्तीच्या जोरावर हे अवघड ध्येय देखील सहज गाठलं व आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला.

प्रियांका मोहितेने याआधी माऊंट एव्हरेस्ट, किलिमांजरो आणि ल्होत्से ही जगातील उंच शिखरं सर केली आहेत. याच कामगिरीसाठी तिला महाराष्ट्र सरकारने प्रतिष्ठेचा शिवछत्रपती पुरस्कार देऊन गौरवलं आहे. प्रियांकाने चढाई केलेलं हे आठ हजार मीटरपेक्षा अधिक उंचीचं तिसरं शिखर ठरलं आहे.