अमेरिकन बनावटीचं F-16 विमान पाडणारे अभिनंदन ठरले पहिले भारतीय वैमानिक

टीम महाराष्ट्र देश– भारताने बालाकोट येथे केलेल्या एअर स्टाईकला प्रत्युत्तर देण्यासाठी २७ फेब्रुवारी रोजी पाकिस्तानच्या विमानांनी भारतीय हद्दीत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता. सतर्क असणाऱ्या भारतीय वायुदलाने पाकच्या विमानांना पिटाळून लावले होते.

यावेळी मिग-२१ चे विंग कमांडर अभिनंदन यांनी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यावेळी F-16 हे अमेरिकन बनावटीचे विमान पाडले होते. अतिशय आधुनिक अशा बनावटीचे हे विमान पाडणारे अभिनंदन हे पहिले भारतीय वैमानिक बनले आहेत.

तब्बल ६० तासांनंतर पाकिस्तानच्या तावडीतून भारतीय वायुसेनेचे विंग कमांडर अभिनंदन वर्थमान हे शुक्रवारी भारतात परतले.

अभिनंदन ज्या विमानात बसले होते, ते मिग-21 बिसन हे विमानही शस्त्रास्त्रांनी सुसज्ज होतं. मात्र, F-16 हे अतिशय आधुनिक तंत्रज्ञानाने बनलेलं लढाऊ विमान आहे. या दोघांमध्ये समान ताकदीची शस्त्रास्त्र वाहून नेण्याची क्षमता आहे. पण, अशा प्रकारच्या हवाई चकमकीसाठी F-16 हे विमान अतिशय ताकदीचं मानलं जातं. मिग -21 या विमानांची रचना F-16 या विमानापेक्षा वेगळी आहे.

त्यामुळे F-16 ला हवाई चकमकीत मात देणं ही आजवर अशक्यप्राय गोष्ट होती. मात्र, ती शक्य करून दाखवत अभिनंदन यांनी हिंदुस्थानी युद्धइतिहासात एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.