हा विक्रम करणारा ‘शिखर धवन’ पहिला भारतीय क्रिकेटपटू

टीम महाराष्ट्र देशा: शिखर धवनने जोहान्सबर्गला भारत आणि आफ्रिकेमध्ये झालेला एकदिवसीय धडाकेबाज शतक ठोकले. तो शिखर धवनचा १००वा वनडे सामना होता. आतापर्यंत आपल्या १००व्या वनडे सामन्यात एकाही भारतीय खेळाडू शतक ठोकू शकला नाही. हा करिश्मा शिखर धवनने करून दाखवला आहे. याआधी आपल्या शंभराव्या क्रिकेट सामन्यात सौरव गांगुलीने ९७ धावा केल्या होत्या. तर शिखर धवनने १०९ धावा केल्या आहेत.

१००व्या वनडे सामन्यात शतक ठोकत पहिला भारतीय होण्याचा मान शिखर धवनने पटकावला आहे. तर जगात तो ९वा फलंदाज ठरला आहे. शिखर धवनच्या आधी फक्त आठ फलंदाजांनी आपल्या शंभराव्या सामन्यात शतक ठोकलं होतं. गॉर्डन ग्रिनीज हा आपल्या शंभराव्या सामन्यात शतक ठोकणारा पहिला फलंदाज होता. पाकिस्तानच्या विरूद्ध त्याने १०२ धावा केल्या होत्या. त्यानंतर न्यूझीलंडचा क्रिस केन, श्रीलंकेच्या कुमार सांगाकारा , वेस्ट इंडिडच्या ख्रिस गेल , पाकिस्तानच्या मुहम्मद युसुफ , वेस्ट इंडिजच्याच रामनरेश सरवन , इंग्लडच्या मार्कस ट्रेस्कोथिक आणि ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर यांनीच हा विक्रम केला आहे.

You might also like
Comments
Loading...