पराक्रमी ‘तानाजी : द अनसंग वॉरियर” ची पहिली झलक प्रदर्शित

टीम महाराष्ट्र देशा : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यातील शूर आणि पराक्रमी तानाजी मालुसरे यांच्या लढाऊ वृत्तीवर प्रकाशझोत टाकणारा तानाजी : द अनसंग वॉरियर’ चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले. या चित्रपटात अभिनेता अजय देवगण प्रमुख भूमिका साकारात आहे. अजय यांनी त्यांच्या ट्वीटर वरून हे पोस्टर त्यांच्या चाहत्यांसाठी शेअर केलें आहे.

आतापर्यंत ऐतिहासिक पात्रांच्या कार्यावर, प्रसंगांवर आणि काही महत्त्वाच्या ऐतिहासिक घडामोडींवर मालिका आणि चित्रपटांच्या माध्यमातून अनेक शूरांच्या यशोगाथा आपण पहिल्या आहेत. यातच आता भर पडली आहे ती म्हणजे छत्रपती शिवरायांच्या सैन्यातील तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमी वीराच्या कार्याची.
अजय देवगणने या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करताना ‘बुद्धी… जी तलवारीप्रमाणेच धारदार होती….. ‘, असं कॅप्शन देत अजयने चित्रपटाचं पहिलं पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आणलं आहे. या कॅप्शनमध्ये त्याने चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर केली आहे. नव्या वर्षात म्हणजेच १० जानेवारी २०२०ला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

या पोस्टवर नजर टाकताच त्यातील तानाजी मालुसरे यांच्या नजरेतील क्रोधाग्नी, युद्धभूमी, मावळे… घोड्यावर बसून येणारे योद्ध्ये या सर्व बाबी त्यात मांडण्यात आल्याच दिसत. त्यावर ‘तानजी : द अनसंग वॉरियर’ असं चित्रपटाचं नावही ठळक शब्दांमध्ये लिहिण्यात आलं आहे. या चित्रपटात काजोल, सैफ अली खान, पंकज त्रिपाठी, शरद केळकर, जगपती बाब, नेहा शर्मा हे कलाकार या चित्रपटातून झळकणार आहेत. ओम राऊतने या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आहे.

महत्त्वाच्या बातम्या :