महाराष्ट्राला पाहिला ब्राह्मण मुख्यमंत्री बाळासाहेब ठाकरेंनी दिला ; संजय राऊतांनी फडणवीसांना लगावला टोला

Raut vs fadanvis

मुंबई : काल विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ‘मी ब्राह्मण आहे म्हणून मला लक्ष्य केले जात, सगळं माझ्या माथी मारलं जातं’ असं वक्तव्य केलं होतं. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आता यावर उत्तर दिले आहे.

ब्राह्मण असल्यामुळंच काही लोक मला जाणीवपूर्वक लक्ष्य करत असल्याच्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘महाराष्ट्रात जात हा विषय कधीच महत्त्वाचा नव्हता. त्यामुळं फडणवीसांच्या बोलण्याशी आम्ही सहमत नाही,’ असं राऊत यांनी म्हटलं आहे.

फडणवीस जे म्हणतात तसं आम्हाला काही वाटत नाही. मुळात महाराष्ट्रात जात हा विषय महत्त्वाचा कधीच राहिलेला नाही. या राज्यात दलित आणि मुस्लिम मुख्यमंत्रीही झाले आहेत. महाराष्ट्राला पहिला ब्राह्मण मुख्यमंत्री देण्याचं काम आणि धाडस बाळासाहेब ठाकरे यांनी केलं होतं. बाळासाहेबांनी महाराष्ट्राला दोन मुख्यमंत्री दिले. एक ब्राह्मण आणि दुसरा मराठा मुख्यमंत्री दिला. त्यापैकी ब्राह्मण मुख्यमंत्री चार वर्षांपेक्षा जास्त काळ होते,’ असं राऊत म्हणाले.

काय म्हणाले होते विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस?

“जेव्हा तुम्ही लोकांना समजावू शकत नाही तेव्हा त्यांना गोंधळात टाका असा एक सिद्धांत आहे. मग कसंही करुन हे मागच्या सरकारच्या माथी कसं मारायचं सुरु होतं. दुर्दैवाने हे बोलणं मला शोभत नाही पण आज स्पष्टपणे सांगतो. काही बोटावर मोजण्याइतके लोक आहेत ज्यांना असं वाटतं की, माझी जात ब्राह्मण असल्याने माझ्या माथी सर्व मारलं तर चालतं. काहीजण असा प्रयत्न करतात. पण मराठा समाजाला आणि राज्यातील सर्वांना समाजाच्या हितासाठी मी काय केलं आहे हे माहिती आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या बातम्या परसवण्याचं काम करणारे यशस्वी होणार नाही,” अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या :-