fbpx

कॉंग्रेसमध्ये आर्थिक संकट, कर्मचाऱ्यांचा पगार लांबला

टीम महाराष्ट्र देशा : २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसचा दारूण पराभव झाला आहे. त्यानंतर अनेक मोठ्या नेत्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला होता. तर अनेक नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकला होत त्यामुळे कॉंग्रेस अडचणीत सापडली आहे. तसेच आता काँग्रेस पक्षाकडे पुरेसा पैसाही उरलेला नसल्याच पाहायला मिळत आहे.

गेल्या पाच वर्षांपासून सत्तेत नसल्याने कॉंग्रेसला पक्षाला पैशांची तीव्र चणचण जाणवू लगालीय आहेत. तर लोकसभेतल्या पराभवानंतर ते आणखी कमी झालेत. त्याचा पहिला फटका काँग्रेससाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बसलाय. यातल्या अनेकांच्या नोकऱ्या गेल्यात तर गेल्या दोन महिन्यांपासून कर्मचाऱ्यांचे पगारच झालेले नाहीत. अनेक विभागांनाही खर्चात बचत करायला सांगण्यात आलंय.

दरम्यान, कॉंग्रेसचा Data Analytics विभाग हा तात्पुरता बंद करण्यात आला आहे. तसेच सोशल मीडियात यापूर्वी ५० ते ५५ जण काम करत होते. आता फक्त ३० लोकांनाच ठेवण्यात आलं आहे.