वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना ‘या’ कारणामुळे पुढे ढकलला जाण्याची शक्यता

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप

इंग्लंड : भारतीय संघ तीन महिन्याच्या दौऱ्यासाठी इंग्लंडमध्ये पोहोचला आहे. येत्या १८ ते २२ जुन दरम्यान भारत आणि न्युझीलंड संघादरम्यान जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेचा अंतिम सामना खेळायचा आहे. या सामन्यानंतर ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात इंग्लंड संघासोबत पाच कसोटी सामन्याची मालिका खेळणार आहे.

भारत विरुद्ध न्यूझीलंड आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना 18 ते 22 जून दरम्यान खेळवला जाणार आहे. मात्र,वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामना काही कारणांमुळे पुढे ढकलला जाण्याची शक्यता आहे. या बातमीमुळे चाहत्यांची मोठी निराशा होण्याची शक्यता आहे. अंतिम सामन्याआधी साऊथॅम्प्टनचे हवामान खूपच खराब असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हवामान अहवालानुसार 18 ते 22 जून दरम्यान साऊथॅम्प्टनमध्ये पावसाची शक्यता आहे. दोन दिवस पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. याचा परिणाम अंतिम सामन्यावर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सामने पुढे जाऊ शकतात किंवा त्यांच्या वेळेत बदल होऊ शकतो.

महत्वाच्या बातम्या 

IMP